नराधम पित्याने केली पत्नीसह दोन मुलींची हत्या

February 23, 2011 5:23 PM0 commentsViews: 3

23 फेब्रुवारी

एका नराधम पित्याने आपल्या पत्नीसह दोन मुलींची क्रूरपणे हत्या केली. आज पिंपरी-चिंचवड परिसरात ही घटना घडली. पिंपरी-शहरातल्या डांगे चौकात असलेल्या हिरामण चाळीमध्ये राहणार्‍या सत्यम कुमार नावाच्या व्यक्तीनं त्याच्या 30 वर्षीय पत्नी आणि दोन मुलींना घरात कोंडलंय त्यानंतर त्यांच्यावर धारदार कुर्‍हाडीने वार केला. आणि क्रूरपणे हत्या केली. यानंतर सत्यमकुमारने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. पण पोलिसांनी जखमी अवस्थेत त्याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सत्यम कुमार हा मुळचा कर्नाटकातील असून व्यवसायाच्या शोधात तो एक महिन्यांपूर्वी पिंपरीमध्ये आल्याचं समजतं. पण या खुनांचं कारण अजून समजू शकलेलं नाही.

close