अमली पदार्थाची तस्करी करणार्‍या पोलिसाला 13 दिवसांची पोलीस कोठडी

February 23, 2011 5:48 PM0 commentsViews:

23 फेब्रुवारी

मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकार्‍यांनी एसीपी अशोक ढवळे याला हेरॉईनच्या तस्करी प्रकरणात काल मंगळवारी अटक केली आहे. आज ढवळे याला कोर्टात हजर केलं असता त्याला आणि त्याच्या साथिदारंाना नऊ मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पिवळ्या दिव्याच्या गाडीतून फिरणार्‍या अशोक ढवळेनं त्याच्या गाडीचा वापर केला हेरॉईनचं स्मगलिंग करण्यासाठी. अमर सिंग या मुंबईतील कुप्रसिद्ध ड्रग्स व्यापार्‍याला हेरॉईनची डिलिव्हरी करताना क्राईम ब्रांचनं त्याला रंगेहाथ अटक केली होती. ढवळे सोबत अमरसिंगलाही अटक करण्यात आली आहे. या दोघांना 9 मार्च पर्यत पोलीस कोठडी देण्यात आली.

close