ओरिसातील जिल्हाधिकारी अजूनही नक्षलवाद्यांच्या ताब्यात

February 23, 2011 5:52 PM0 commentsViews: 6

23 फेब्रुवारी

ओरिसा येथील मलकानगिरीच्या जिल्हाधिकारी आर व्ही क्रिश्ना आणि ज्युनिअर इंजिनिअर पबित्र माझी यांचं नक्षलवाद्यांनी अपहरण केल्यानंतर आता आठवड्यानंतर ज्युनिअर इंजिनिअर माझी याची आज सुटका करण्यात आली आहे. तर जिल्हाधिकारी क्रिश्ना यांनासुद्धा शुक्रवारी सोडण्यात येईल असं समजत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नक्षलवाद्यांनी जिल्हाधिकार्‍यांना सोडण्यापूर्वी ओरीसा सरकारबरोबर केलेल्या कराराची प्रतही मागितली आहे. पण आता माओवाद्यांनी नक्षलवादी श्रीरामुल्लू यांच्या सुटकेची मागणी केली. श्रीरामुल्लू यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी मलकानगिरी कोर्टात निर्णय होणार आहे.

close