वाळूमाफियांवर कारवाईची जबाबदारी पोलिसांची नाही !

February 24, 2011 9:22 AM0 commentsViews: 1

24 फेब्रवारी

राज्यातील माफियांची माहिती राज्य सरकाला देण्यात आली आहे. त्याबाबत सरकारच निर्णय घेईल. खरं तर वाळू, तेल आणि रॉकेल माफियांवर पोलिसांऐवजी त्या त्या विभागांनी कारवाई कराव्यात असा राज्य सरकारचाच निर्णय आहे. मात्र दरवेळी पोलिसांनाच विचारणा करण्यात येते. मोक्का कायदा लागू केल्यानंतर राज्यातील माफिया राज संपलेलं आहे पण कुठेही छोटीसी घटना घडली तरी माफियाराज म्हटलं जाते ही विधान आहे राज्याचे पोलीस महासंचालक डी शिवानंदन यांचे. औरंगाबाद येथील अत्याधुनिक पोलीस नियंत्रण कक्षाचे उद्घाटन डी शिवानंदन यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील सर्व माफियांची माहिती सरकारकडे असल्याचं कबूल केलं.

close