अकोला जिल्हा परिषद निवडणुकीत आचारसंहिता भंग

November 6, 2008 7:26 AM0 commentsViews: 2

6 नोव्हेंबर, अकोलाअकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. पण सत्ताधारी भारिप बहुजन महासंघाकडूनच आचारसंहिता धाब्यावर बसवली जात आहे. पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आणि तिकीट वाटप सुरू आहे. यासाठी महासंघाचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बालमुकुंद भिरड यांच्या सरकारी बंगल्याचा खुलेआम वापर करण्यात येत आहे. याप्रकरणी अकोल्याच्या कलेक्टरनी पक्षाला नोटीस बजावून कारवाईचे संकेत दिले आहेत. दरम्यान, याच्या वृत्तांकनासाठी गेलेल्या एका पत्रकाराला भारिप बहुजन संघाच्या पदाधिकार्‍यांनी मारहाण केल्याचं वृत्त हाती आलं आहे.

close