बंगळुरमध्ये पोलिसांचा किक्रेट फॅन्सवर लाठीचार्ज

February 24, 2011 11:18 AM0 commentsViews: 6

24 फेब्रुवारी

बंगळुरुमध्ये वर्ल्ड कपची तिकीट घेण्यासाठी आलेल्या फॅन्सवर लाठीमार झाला. चिन्नास्वामी स्टेडियमवर येत्या रविवारी भारत आणि इंग्लंड दरम्यानची मॅच होणार आहे. याच सामन्याची तिकीट विकत घेण्यासाठी स्टेडियमबाहेर फॅन्सची तुफान गर्दी जमली होती. पण गर्दी प्रमाणाबाहेर वाढल्यावर पोलिसांना अखेर ती पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. मुंबईत होणार्‍या वर्ल्ड कपच्या फायनलची फक्त तीन हजार तिकीट विक्रीसाठी उपलब्ध आहेत अशी बातमी आल्यामुळे आधीच क्रिकेट फॅन्समध्ये अस्वस्थता आहे. त्यापूर्वीच तिकीट विक्रीतल्या सावळ्या गोंधळामुळे आयसीसीनं अध्यक्ष शरद पवार यांना एक खरमरीत पत्र लिहीलं आहे. पवार वर्ल्ड कप आयोजन समितीचेही अध्यक्ष आहेत. एकूण 40 हजार प्रेक्षकांची क्षमता असलेल्या मैदानात केवळ 4 हजार तिकीट सामान्य प्रेक्षकांसाठी आहेत. त्यामुळेच हा गोंधळ होत असल्याचं बोललं जातं आहे.

close