आयोजन समितीच दोषी कशी काय ? – कलमाडी

February 24, 2011 11:42 AM0 commentsViews: 1

24 फेब्रुवारी

कॉमनवेल्थ गेम्स प्रकरणी ललित भानोत आणि व्ही.के.वर्मा या कलमाडींच्या सहकार्‍यांना तर अटक झालेलीच आहे आणि आता पुढच्या आठवड्यात खुद्द कलमाडींना अटक होण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळेच कलमाडींचा कांगावा आता वाढत चालला आहे. कॉमनवेल्थ गेम्स प्रकरणी मला मुद्दाम टारगेट केलं जातं आहे असा दावा त्यांनी केला आहे. कॉमनवेल्थ गेम्सच्या वेळेस सर्व परवानग्या क्रीडा मंत्रालयाने दिल्या होत्या असं म्हणत त्यांनी आपली जबाबदारी क्रीडा मंत्रालयावर ढकलली. रांचीमध्ये नॅशनल गेम्स सुरू आहेत. आणि कलमाडी सध्या तिथे आहेत. कॉमनवेल्थ गेम्स प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जेपीसी नेमली जावी अशी मागणी पुन्हा एकदा कलमाडी यांनी केली.

close