जेपीसीमध्ये सहभागी होण्यास शिवसेनेचा नकार

February 24, 2011 12:12 PM0 commentsViews: 5

24 फेब्रुवारी

टू जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी जेपीसी म्हणजेच संयुक्त संसदीय चौकशी समितीची घोषणा आज लोकसभेत करण्यात आली. मात्र जेपीसीमध्ये शिवसेनेनं सहभागी होणार अशी भूमिका घेतली आहे. कॉमनवेल्थ आणि आदर्श सोसायटी प्रकरणाचा सहभाग जेपीसीमध्ये करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. दरम्यान जेपीसी म्हणजे संयुक्त संसद समितीत 30 खासदारांचा सहभागअसणार आहे. यापैकी 15 खासदार युपीएचे असतील. तर 15 विरोधी पक्षांतील असतील. तसेच लोकसभेतून 20 खासदार यामध्ये असतील आणि राज्यसभेतून 10 खासदार असतील. विरोधी पक्षामध्ये भाजपचे सहा सदस्य असणार आहे यापैकी एक जागा ही शिवसेनेला देण्यात आली आहे. मात्र शिवसेनेनं आपण यात सहभागी होणार नाही असं आज स्पष्ट केलं आहे.

close