राहुल ठाकरेचा पहिला सिनेमा ‘राडा रॉक्स’

February 24, 2011 1:47 PM0 commentsViews: 5

24 फेब्रुवारी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आणि स्मिता ठाकरे यांचा मुलगा राहुल ठाकरे आता चित्रपट दिग्दर्शनात उतरत आहेत. राहुल फिल्मची निर्मिती असलेल्या 'राडा रॉक्स' या मराठी सिनेमाचं नुकतंच म्युझिक लाँच करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या म्युझिक लाँच साठी माधुरी दीक्षित हजर होती. माधुरीच्या हस्ते या सिनेमाचं म्युझिक लाँच करण्यात आलं. राडा नावाच्या एका रॉक बॅण्ड भोवती या सिनेमाचं कथानक फिरतंय. यावेळी शिवसेनाप्रमुखांनीही आपल्या नातवाला त्याच्या सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

close