ग्लोबल कोकण महोत्सवाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

February 24, 2011 1:57 PM0 commentsViews: 7

24 फेब्रुवारी

ग्लोबल कोकण महोत्सवाचं आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. कोकणाच्या विकासाची चर्चा करताना व्यासपीठावरच्या नेत्यांमध्ये जुगलबंदी रंगली. मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना कोकणचे प्रश्न सांगत चिमटे काढले आणि कृपाशंकर सिंग यांना कोकणात परप्रांतियांचे लोंढे न आणण्याची विनंती केली. तर उद्योगमंत्री नारायण राणे यांनी या व्यासपीठाचा नांदगावकर यांनी राजकारणासाठी वापर केल्याचा टोला लगावला तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोकणच्या विकासासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं सांगत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

close