जैतापूर प्रकल्पाच्या विरोधात मच्छीमारांचा मोर्चा

February 24, 2011 10:43 AM0 commentsViews: 2

24 फेब्रुवारी

कोकण किनारपट्टीवर येऊ घातलेले वीज प्रकल्प आणि परराज्यातल्या नौकांद्वारे कोकण किनारपट्टीवर होणारी मासेमारी याविरोधात रत्नागिरीतल्या मच्छीमारांनी आज मोर्चा काढला. या मोर्चात नो न्यूक्लीयर चा फलक झळाकावीत जैतापूर अणुउर्जा प्रकल्पालाही विरोध दर्शवण्यात आला. 26 तारखेला होणा-या मुख्यमंत्र्यांच्या जैतापूर दौ-याच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांनी काढलेल्या या मोर्चामुळे प्रकल्पविरोधी वातावरण निवळण्याची शक्यता नसल्याचंच बोललं जातं आहे. साखरी नाटे परिसरातल्या मच्छिमारांचा या प्रकल्पाला जो विरोध आहे त्याला पाठिंबा देण्याची भूमिका या मोर्चात सहभागी झालेल्या अनेक मच्छिमार सोसायट्यांच्या प्रतिनिधींनी मांडली

close