दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजवर 7 विकेट राखून विजय

February 24, 2011 5:57 PM0 commentsViews: 5

24 फेब्रुवारी

एबी डिव्हिलिअर्सनं ठोकलेल्या दमदार सेंच्युरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं वर्ल्ड कपस्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. पहिली बॅटिंग करणार्‍या वेस्ट इंडिजनं विजयासाठी 223 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. पण हे आव्हान आफ्रिकेनं तब्बल 7 विकेट राखून पार केलं. दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. हाशिम आमला आणि जॅक कॅलिस झटपट आऊट झाले. पण यानंतर कॅप्टन ग्रॅहम स्मिथ आणि एबी डिव्हिलिअर्सनं तिसर्‍या विकेटसाठी 119 रन्सची पार्टनरशिप करत आफ्रिकेची इनिंग सावरली. स्मिथ 45 रन्सवर आऊट झाला. पण डिव्हिलिअर्सनं झुंजार बॅटिंग कायम ठेवत टीमला विजय मिळवून दिला. डिव्हिलिअर्सन नॉटआऊट 107 रन्स केले तर त्याआधी वेस्ट इंडिजची टीम 222 रन्सवर ऑलआऊट झाली. विंडिजतर्फे डेरेन ब्राव्होनं सर्वाधिक 73 रन्स केले.पण इतर बॅट्समन मोठा स्कोर उभारु शकले नाहीत.

close