माळशेज रेल्वे मार्ग अजुनही मंजुरीच्या प्रतिक्षेत

February 25, 2011 8:16 AM0 commentsViews: 9

25 फेब्रुवारी

राज्यातल्या विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या चार प्रदेशांना जोडणारा प्रस्तावित माळशेज रेल्वे मार्ग अजुनही मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. गेली 16 वर्षे इथल्या नागरिकांनी प्रयत्न करुनही या मार्गाला रेल्वेने अद्यापही हिरवा कंदील दिलेला नाही. याच रेल्वे माग्रासाठी माळशेज रेल्वे कृती समितीने गेल्यावर्षी पाच लाख सह्यांचं निवेदनही रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांना दिलं होतं. मात्र तरीही याबाबत काहीच पावलं उचलली गेली नाहीत.या रखडलेल्या प्रकल्पामध्ये कल्याण – अहमदनगर रेल्वेमार्गाचाही समावेश आहे. हा मार्ग प्रत्यक्षात आला तर विदर्भ , मराठवाडा , पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण नजीकच्या मार्गाने जोडले जातील.

close