गोध्रा प्रकरणी शिक्षेची सुनावणी 1 मार्चला

February 25, 2011 9:31 AM0 commentsViews: 7

25 फेब्रुवारी

गोध्रा जळीतकांड प्रकरणावरील शिक्षेची सुनावणी आता 1 मार्चला होणार आहे. 22 फेब्रुवारीला साबरमती विशेष कोर्टानं गोध्रा जळीतकांड हे कटकारस्थान असल्याचा निर्वाळा देत 31 जणांना दोषी ठरवलं होतं. याच 31 जणांना आज शिक्षा सुनावणार होते. मात्र कोर्टानं ही तारीख वाढवत आता 31 जणांच्या शिक्षेची सुनावणी 1 मार्चला होणार असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान सरकारी पक्षाने सर्व 31 दोषींना फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी केली आहे.

close