टीम इंडिया दुखापतीनं ग्रस्त पण नाही त्रस्त !

February 25, 2011 10:16 AM0 commentsViews:

25 फेब्रुवारी

भारत आणि इंग्लंड दरम्यान या रविवारी बंगळूरुत मॅच रंगणार आहे. आणि या मॅचसाठी टीम इंडिया सध्या बंगळूरुच्या नॅशनल क्रिकेट ऍकॅडमीत जोरदार सराव करत आहे. पण या सरावादरम्यान वीरेंद्र सेहवागच्या हातावर बॉल बसल्याचं समजतयं. सरावा दरम्यान जहीर खानचा बॉल सेहवागच्या बरगड्यांवर लागला आणि सेहवाग तसाच खाली कोसळला. पण सेहवागला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसल्याचं आणि रविवारच्या मॅचसाठी तो फिट असल्याचे सांगण्यात आलं आहे. याअगोदर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्या गुडघ्याची एमआरआय चाचणी केली होती. तर काल युवराजही सरावादरम्यान काही काळ लंगडताना दिसला. आणि त्याला धापही लागत होती.

close