आमदार दिलीप वाघ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

February 25, 2011 10:47 AM0 commentsViews: 6

25 फेब्रुवारी

राष्ट्रवादीचे पाचोर्‍याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप वाघ यांच्या विरोधात नाशिकमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. 21 फेब्रुवारीला आमदार वाघ आणि त्यांचे सहकारी महेश माळी नाशिकच्या विश्रामगृहावर दाखल झाले. आचारसंहिता चालू असताना त्यांनी विश्रामगृहाचा गैरवापर केल्याचं पुढे आलं आहे. सिंहगड विश्रामगृहात त्यांनी स्वत:साठी एक रुम, तर प्रतापगडमध्ये बॉडीगार्डसाठी एक रुम जबरदस्तीने बुक करवून घेतली. दरम्यान नोकरीचं आमिष दाखवून त्यादिवशी आमदारांनी अतिप्रसंग केल्याची तक्रार एका महिलेनं सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. हा गुन्हा दाखल व्हावा म्हणून शिवसेनेच्या वतीनं पोलिसांवर दबाव येत होता तर दाखल होवू नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करत होते. जळगावमधल्या राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना या स्थानिक राजकारणाची या प्रकारणाला पार्श्वभूमी असल्याचा अंदाज आहे. दरम्यान वाघ हे राष्ट्रवादीचे आमदार असले तरी त्यांच्याविरूद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे. तर तपास कुठलाही भेदभाव न करता होईल असं आश्वासन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिलं आहे.

close