राज्यात ‘बनावट’ धाड सत्राचं भेसूर चित्र !

February 25, 2011 10:53 AM0 commentsViews: 3

25 फेब्रुवारी

नाशिक जिल्ह्यातील मनमाडजवळ अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणेंच्या हत्येला एक महिना पूर्ण होतोय. यानिमित्तानं राज्यातल्या भेसळीचं भेसूर चित्र पुढे आलं. मात्र त्यावरची कारवाई हा देखावा असल्याचं आता खुद्द पोलीस महासंचालकांनीच मान्य केलं.

प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी 25 जानेवारीला पुरोगामी महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात काळा दिवस ठरला. मनमाडमध्ये पोपट शिंदेच्या भेसळीच्या अड्‌ड्यावर यशवंत सोनवणे यांना जीवंत जाळण्यात आलं. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात एकचं हादरा बसला . प्रशासन खडबडून जागं झालं आणि राज्यभर भेसळीच्या अड्‌ड्यांवर धाडी पडल्या. 24 तासात पडलेल्या या धाडी जास्त संताप आणणार्‍या होत्या. पुरवठा आणि पोलीस प्रशासनाचे भेसळखोरांसोबत साटलोटं असल्याचाच तो पुरावा होता. आता तर त्या धाडी सर्वांच्या समाधानासाठी टाकल्याचं खळबळजनक स्पष्टीकरण पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांनी केलं.

डी. शिवानंदन म्हणता की, पोलिसांना धाडी टाकण्याचे आधिकारच नाहीत. ते 2001 च्या जीआरनं काढून टाकण्यात आले आहेत. त्या धाडी म्हणजे तुमच्या समाधानासाठी होत्या. सोनवणे प्रकरणातल्या आरोपींसह चार भेसळखोरांना मोक्का लागला. त्यापैकी एकाने कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला पण त्यांना अजून पोलीस शोधू शकलेले नाहीत. दुसरीकडे भेसळ रोखण्याचा प्रशासनाचा देखावाच असल्याचं सिद्ध झालं आहे. यात भरडला जातोय रॉकेलसारख्या जीवनावश्यक घटकावर अवलंबून असलेला गोरगरीब. कितेक ठिकाणी रॉकेल मिळत नाही, रॉकेल मिळवण्यासाठी खूप चकरा मारायला लागतात.तर काही ठिकाणी ब्लॅकनं घ्यावं लागतं तेही 35 रुपये लिटरनं. कारवाईचा देखावा करणारं सरकार यांना काय उत्तर देणार हा प्रश्न सर्व सामान्यांना पडत आहे.

close