पुण्यात रंगणार सायक्लोथॉनची धूम

February 25, 2011 11:21 AM0 commentsViews: 5

25 फेब्रुवारी

सायकलींचे शहर अशी एकेकाळी ओळख असणार्‍या पुण्यामध्ये हे चित्र पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी मिळणार आहे. निमित्त आहे स्पोर्ट्स 18 तर्फे आयजित करण्यात आलेल्या सायक्लोथॉन या स्पर्धेचं. दिल्ली, मुंबई बंगलोर आणि चंदिगड पाठोपाठ आता पुण्यात सायक्लोथॉनची धुम रंगणार आहे. येत्या 27 फेब्रुवारीला ही सायक्लोथॉन शर्यत पुण्यात होणार आहे.

तुमच्याकडे जर सायकल असेल तर येत्या रविवारी 27 फ्रेबुवारीला तुम्हाला लखपती होण्याची संधी आहे. कारण हिरो सायकल्स आणि स्पोर्टस् 18 तर्फे पुण्यात सायक्लोथॉनचं आयोजन करण्यात आलं. आणि जिंकणार्‍यास तब्बल चार लाखांची बक्षिस मिळणार आहेत. पुण्यात पहिल्यांदाच सायक्लोथॉनचं आयोजन होतं आहे त्यामुळे पुणेकरही खुष झाले.

रविवारी 27 फ्रेबुवारील सकाळी 6 वाजता खडकीच्या सिंबायोसिस कॉलेज ऑफ मॅनेजमेंट पासुन या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. एकूण पाच गटात ही स्पर्धा होईल. व्यावसायिक स्पर्धकांसाठी 50 किलोमीटरची मुख्य स्पर्धा असेल. हौशी सायकलपटूंसाठी 20 किलोमीटरची, तर कार्पोरेट विभागासाठीही 20 किलोमीटरची स्पर्धा असेल. याशिवाय एलजी ग्रीन राईड 10 किलोमीटर स्पर्धाप्रकारात सायकलिंगचा मनमुराद आनंद लुटता येईल. आणि 8 ते 13 वयोगटासाठीही 9 किलोमीटरची ज्युनियर सायकल स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्ही www.herocyclothon.com या वेबसाईटवर लॉगऑन करु शकता. सो गेट रेडी ऍण्ड गेट सेट गो.

close