प्रदूषण विरहित उद्योग कोकणात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील – मुख्यमंत्री

February 25, 2011 2:19 PM0 commentsViews: 1

25 फेब्रुवारी

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शनिवारपासून जैतापूर दौर्‍यावर आहेत. पर्यटनावर आधारित कोकणात पर्यावरणाची हानी होणार नाही अशा प्रकारच्या लाईट इंडस्ट्रीज आणण्यासाठी धोरण स्वीकारलं जाईल असं सूतोवाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोकण दौर्‍यात केलं. आज सिंधुदूर्ग जिल्हा मुख्यालयात झालेल्या अधिकार्‍यांसोबतच्या बैठकीत पालकमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदूर्ग जिल्ह्याचे कोकण पॅकेजमधील शिल्लक असलेला निधी मिळावा तसेच सिंचनासाठी 700 कोटी मिळावेत अशी मागणी केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत प्रदूषण विरहित असलेले उद्योग कोकणात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील राहणार असल्याचं सांगितले आहे.

close