मुंबईत बोट फेस्टिव्हलला सुरूवात

February 25, 2011 7:00 AM0 commentsViews: 1

25 फेब्रुवारी

मुंबईत गुरूवारपासून आंतराष्ट्रीय बोट फेस्टिव्हलला सुरवात झाली आहे या फेस्टिव्हलचं उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झालं आहे. या फेस्टिव्हल मध्ये तीस हजार रुपयांपासून ते सहा कोटी रुपयांपर्यंत किमतीच्या बोट्स प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. लक्झरी बोट्सबरोबरच मरीन पोलिसांना लागणार्‍या बोट्सही इथे प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. भारतात गेल्या दहा वर्षात खासगी बोट्स वापरणार्‍यांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे अश्या प्रकारच्या ग्राहकांच्या गरजा ओळखुन हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. हे प्रदर्शन 27 फेब्रवारी पर्यंत सुरू राहणार आहे.

close