मनसेच्या प्रश्नावरून युतीत आरोप प्रत्यारोप

February 25, 2011 2:53 PM0 commentsViews: 6

25 फेब्रुवारी

मनसेशी युती करण्याच्या मुद्यावर नितीन गडकरी यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोर्‍हे यांनी टीका केली होती. पण नीलम गोर्‍हे यांना अशाप्रकारे टीका करण्याचा अधिकार नाही या शब्दात भाजपनं नीलम गोर्‍हेंना फटकारलं आहे. नीलम गोर्‍हे या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी वारंवार प्रसिद्धी माध्यमांकडे धाव घेतात अशी टीकाही भाजपने केली. माधव भंडारी यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही टीका करण्यात आली आहे. काल गुरूवारीच मुंडेंच्या मनसेविषयीच्या भूमिकेला गडकरींनी पाठिंबा दिला होता.

close