नागपूर टेस्टमध्ये सचिन-लक्ष्मणनं डाव सावरला

November 6, 2008 8:57 AM0 commentsViews: 4

6 नोव्हेंबर, नागपूरनागपूर टेस्टमध्ये भारताने दमदार सुरुवात केली खरी, पण लंच पूर्वीच्या अर्ध्या तासात भारताच्या तीन विकेट्स पटकावत ऑस्ट्रेलियानेही शानदार कमबॅक केला. तेंडुलकर आणि लक्ष्मणने नंतर दमदार पार्टनरशिप करत भारताचा डाव सावरलाय. सचिननं त्याच्या करिअरची 52 वी हाफ सेंच्युरी ठोकली. टी ब्रेकपर्यत भारताने तीन विकेट गमावून 203 रन्स केल्या आहेत. सचिन नाबाद 62 तर लक्षमण नाबाद 34 धावांवर खेळत आहेटॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतल्यावर सेहवाग आणि विजय यांनी 98 रन्सची आक्रमक ओपनिंग केली. खास करुन पहिलीच आंतरराष्ट्रीय टेस्ट खेळणार्‍या विजयच्या खेळात कुठलाही नवखेपणा दिसत नव्हता. ब्रेट ली आणि मिशेल जॉनसन या ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर्सना तो आत्मविश्वासाने सामोरा गेला. पण तो मोठा स्कोअर करणार असं वाटत असतानाच धाडसी शॉट मारण्याच्या प्रयत्नात तो 33 रन्सवर आऊट झाला. वॉटसनच्या बॉलिंगवर विकेट कीपर हॅडिनने त्याचा सोपा कॅच घेतला. त्यानंतर आलेला राहुल द्रविड जेमतेम दोन – तीन मिनिटं पिचवर टिकला. जेसन क्रेझाने त्याला डकवर आऊट केलं. दुसर्‍या बाजूने विरेंद्र सेहवागने मात्र दमदार बॅटिंग करत आपली सोळावी हाफ सेंच्युरी ठोकली. पण त्याची घोडदौड रोखली ती क्रेझानेच. एका अप्रतिम बॉलवर त्याने सेहवागला बोल्ड केलं. त्यानंतर मात्र सचिन-लक्षमणनं शानदार बॅटिंग करत ऑस्ट्रेलियन बॉलर्सला आणखी यश मिळू दिलं नाही.

close