नागपूर सत्र न्यायालयात राज ठाकरेंना जामीन

February 25, 2011 2:12 PM0 commentsViews: 6

25 फेब्रुवारी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नागपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने 25 हजार रूपयांच्या जामीनावर सुटका केली आहे. नोव्हेंबर 2008 मध्ये कोराडी गावात दगडफेक प्रकरणात पोलिसांनी इतर कार्यकर्त्याप्रमाणे राज ठाकरेंनाही जबाबदार धरलं होतं. याच प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाच्या आरोपपत्रानुसार राज ठाकरे यांना 1 मार्च पर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आज राज ठाकरे नागपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर झाले होते.

close