यंदाच्या वर्षात 9 टक्क्यांचा विकासदर राखणार !

February 25, 2011 4:55 PM0 commentsViews:

25 फेब्रुवारी

रेल्वे बजेटच्या आधी आज लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण मांडण्यात आलं. येत्या आर्थिक वर्षात देशाचा विकासदर 9 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज यात वर्तवण्यात आला आहे. पण अरब जगतात सुरू असलेल्या आंदोलनांचा फटका आपल्या अर्थव्यवस्थेलाही बसणार आहे. त्याचा वाईट परिणाम विकासाच्या दरावर आणि महागाईवर होऊ शकेल. सध्या वाढलेल्या किमती सरकारने तातडीने नियंत्रणात आणण्याची गरज आहे असंही सर्वेक्षणात म्हटले आहे. औद्योगिक उत्पादनांत झालेली घट चिंताजनक आहे पण ती तात्पुरती असण्याची शक्यता आहे असं पुढे म्हटलं आहे. या वर्षात वित्तीय तूट 4.8 टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.

close