मुंबईकरांची ममता दीदींनी केली निराशा

February 25, 2011 5:06 PM0 commentsViews: 2

25 फेब्रुवारी

यंदाच्या रेल्वे बजेटनं 70 लाख मुंबईकरांची निराशाच केली. गेल्या वर्षीच्या 101 नव्या फेर्‍यांच्या तुलनेत यंदा फक्त 47 फेर्‍या वाढवण्याची घोषणा ममता बँनर्जी यांनी केली आहेत. पण दिदींची ही ममता मुंबईकरांना पुरेशी नाही. तसेच सर्व 9 डब्यांच्या गाड्या 12 डब्यांच्या करण्यात येणार आहे. तर ठाणे- वाशी-पनवेलसाठी नव्या लोकलची घोषणा रेल्वे मंत्र्यांनी केली. अंधेरी-बोरिवली-विरार नव्या गाड्याही सुरू होणार आहे. तसेच मुंबई- अलाहबाद, पुणे-अहमबाद दुरांतो एक्सप्रेस सुरू करण्यात येणार आहेत. मुंबई ते अहमदाबाद डबल डेकर एसी तसंच मनमाड-मुंबई एक्सप्रेस सुरू होणार आहे.

मुंबईकरांसाठी लोकलच्या 47 नव्या फेर्‍या सुरू करणार असल्याची घोषणा ममता दीदींनी केली. पण एकही नव्या लोकलची घोषणा करण्यात आलेली नाही. गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षी 9 डब्यांच्या सर्व गाड्या 12 डब्यांच्या करण्यात येतील अशी घोषणा ममतादिदींनी केली. लोकलच्या 47 नव्या फेर्‍या ठाणे -वाशी, ठाणे-पनवेल, बोरिवली-विरार, अंधेरी-विरार, वांद्रे-विरार आणि चर्चगेट-बोरिवली दरम्यान सुरु होणार आहेत. हार्बर, वेस्टर्न लाईनवर फेर्‍या वाढवल्या असल्या तरी सेंट्रल लाईनवर एक फेरी वाढवण्यात आलेली नाही आहे.

वर्ल्ड क्लास रेल्वे स्टेशन उभारण्याची योजना फोल ठरल्याची कबुलीच रेल्वे मंत्र्यांनी दिली. रेल्वे ट्रॅक ओलांडताना दरम्यान होणार्‍या अपघातांचं प्रमाण कमी करण्यासंदर्भातही ठोस उपाययोजना सुचवण्यात आलेली नाही. त्यातच दिलासा म्हणजे ठाकूर्लीत गॅसवर आधारीत उर्जा प्रकल्प उभारण्याची घोषणा रेल्वे मंत्र्यांनी केली. एवढीच काय ती गुंतवणूक मुंबई परिसरात होणार आहे. मुंबईमध्ये नव्या कारशेड सुरु करणं, उपनगरामध्ये टर्मिनस सुरु करणं यासारख्या अनेक पायाभूत सुविधांबद्दल रेल्वेमंत्र्यांनी शब्दही उच्चारला नाही. त्यामुळे मुंबईकरांच्या लोकलच्या समस्यांवर या बजेटने काही उतारा पडेल, असं वाटत नाही.

मुंबईसाठी

- ठाकुर्ली गॅस पॉवर स्टेशन, गडचिरोली – बस्तर या दुर्गम भागात रेल्वे मार्ग टाकणार- मुंबई आणि उपनगरांसाठी लोकलच्या आणखी 47 नवीन फेर्‍या

- मुंबई सेंट्रल – दिल्ली एसी दुरांतो- अलाबाहाद- मुंबई दुरांतो

- पुणे- अहमदाबाद दुरांतो – नागपूर -मुंबई दुरांतो रोज

- पुणे सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेस- मुंबई- अहमदाबाद डबल डेकर एसी

- मनमाड-मुंबई एक्स्प्रेस- नागपूर- कोल्हापूर एक्स्प्रेस व्हाया पूर्णा, लातूर

- मुंबई- चंदीगड एक्सप्रेस- मुंबई-अलाहाबाद एक्सप्रेस- मुंबई- इलाहाबद एक्सप्रेस

close