लिबियात रक्तपात ; भारतीयांना आणण्यास विमान रवाना

February 25, 2011 5:22 PM0 commentsViews: 1

25 फेब्रुवारी

इजिप्तमध्ये सत्तापालट शांततेत झाला असला तरी लिबियात मात्र रक्तपाताला सुरवात झाली. राजधानी ट्रायपोलीमध्ये सरकारविरोधी निदर्शकांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात येत आहे. लष्करशाह गद्दाफींचे समर्थक हा गोळीबार करत आहे. राजधानीहून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या झवियाह शहरात एका मशीदीत थांबलेल्या निदर्शकांवर गद्दाफी समर्थकांनी हल्ला केला. अत्याधुनिक शस्त्रांचा वापर केल्यामुळे शंभराच्या वर निदर्शक काही क्षणांत ठार झाले. पण दुसरीकडे गद्दाफींचं देशावरचे नियंत्रण सुटत चालले आहे. बेंगाझी नावाचे लिबियातले दुसरे सगळ्यात मोठ शहर आता निदर्शकांनी ताब्यात घेतलं आहे. हिंसाचाराने होरपळलेल्या या देशात अठरा हजार भारतीय अडकले आहेत. त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी एअर इंडियाची विशेष विमान आणि एक विशेष जहाज पाठवण्यात आले आहेत. पुढच्या दोन आठवड्यांत सर्व भारतीयांना लिबियातून बाहेर काढण्याचे प्रयत्न नवी दिल्लीतून सुरू आहेत.

close