शाहरूख करतोय मुगले आझमवर डॉक्यूमेंटरी

February 25, 2011 5:36 PM0 commentsViews: 5

25 फेब्रुवारी

बॉलिवूड किंग शाहरूख खानवर आतापर्यंत अनेक लोकांनी डॉक्यूमेंटरी केली आहे. पण आता शाहरूखनेच एक नवीन डॉक्यूमेंटरी बनवली. आता तुम्ही विचार करत असाल कि हा सुपरस्टार कोणावर डॉक्यूमेंटरी करतोय याचा खरंतर शाहरूखनं त्याचं एक स्वप्न पूर्ण केल आणि हे स्वप्न आहे मुगले आजम या गाजलेल्या हिंदी सिनेमावर डॉक्यूमेंटरी बनवण्याचं.

मुगले आझम हा सिनेमा बॉलिवूडसाठी एक उत्तम उदाहरण आहे. या सिनेमानं ऐतिहासीक रेकॉर्ड केला. आणि म्हणूनच किंग खाननं त्याच्या रेड चिली प्रोडक्शन तर्फे मुगले आझमवर एक डॉक्यूमेंटरी बनवली आहे. ही डॉक्यूमेंटरी बनवण्याचा उद्देश म्हणजे सिनेमाचं जतन आणि या सिनेमाचे दिग्दर्शक के आसीफ यांच्याबद्दल असलेला आदर.

या फिल्ममध्ये आमीर खान, अमिताभ बच्चन, प्रियांका चोप्रा, रणबीर कपूर, दिपिका पदुकोण, करिना कपूर असे बॉलिवूडमधील काही मोठया कलाकारांनी त्यांचे विचार आणि अनुभव मांडले आहेत. तर दुसरीकडे फिल्म साउंड, कलर इफेक्ट व्यतिरिक्त एम.एफ.हुसेन यांचं पेंटींगही पाहता येईल. ज्यामुळे सिनेमातील महत्वाची दृष्य अधिक खुलून दिसतील. मुगले आझम या सिनेमाचे करोडो चाहते असतील. पण शाहरूखने ही डॉक्यूमेंटरी बनवून तो या सिनेमाचा सगळ्यात मोठा चाहता आहे हे सिद्ध केलं.

close