बांगलादेशचा आयर्लंडवर 28 रन्सनी विजय

February 25, 2011 5:47 PM0 commentsViews: 1

25 फेब्रुवारी

बांगलादेशच्या टीमने आज स्पर्धेतला आपला पहिला विजय नोंदवला. आयर्लंड टीमवर त्यांनी 28 रन्सनी विजय मिळवला. बांगलादेशनी पहिली बॅटिंग करत 205 रन केले. पण त्यांच्यासाठी ही इनिंग सोपी नव्हती. 150 रन्समध्येच त्यांचे सात बॅट्समन आऊट झाले होते. पण रकीबुल हसनचे 38 आणि नईम इस्लामचे 29 रन यामुळे त्यांनी निदान दोनशे रनचा टप्पा ओलांडला. याला उत्तर देताना आयर्लंडच्या बॅट्समननाही फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. 178 रनमध्ये त्यांची टीम ऑलआऊट झाली. ओब्रायनने सर्वाधिक 38 रन केले. तर बांगलादेशतर्फे शफीऊल इस्लामने चार विकेट घेतल्या.

close