जबाबदारी माझी, सहकार्य करा !

February 26, 2011 9:33 AM0 commentsViews: 6

26 फेब्रुवारी

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आज शनिवारी जैतापूर दौर्‍यावर आहे. प्रकल्पग्रस्तांशी संवाद सादत असताना मुख्यमंत्री म्हणाले की, जैतापूर प्रकल्पाबाबत कुठल्याही तज्ञांशी चर्चा करण्याची तयारी आहे ज्यांची जमीन प्रकल्पग्रस्त बाधित आहे त्यांना पैसे देण्याची राज्याची जबाबदारी आहे. महाराष्ट्र पुनर्वसन खात्याने कायद्या प्रमाणे काही रक्कम घोषित केली असेल तरी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून केंद्र सरकारकडून जास्त मोबदला मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे. पैसा देण हा विषय नाही. तर गैरसमज केली दिशाभूल केली हे सिध्द करून दाखवण्याचा विषय आहे. या प्रकल्पासाठी काही जमीन संपादित करण्यात आली त्यात मच्छिमारांची ही काही जमीन गेली असेल पण त्यांच्या मनात शंका निर्माण झाल्या असतील पण प्रकल्पासाठी समुद्रातून पाणी घेऊन ते गरम करून परत सोडणार असा प्रचंड मोठा गैरसमज पसरवण्यात आला आहे. हा गैरसमज दूर करण्याची गरज आहे असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं. तर दुसरीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादीचे असूनदेखील या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही नेता उपस्थित नव्हता.

दरम्यान जैतापूर प्रकल्प आम्हाला नकोच असं निक्षून सांगत जैतापूर प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांसमोरच आपला प्रकल्पाला असलेला तीव्र विरोध स्पष्ट केला. आमच्या जमिनी संपादित नव्हे तर बळकावल्या आहेत असा थेट आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला. तर प्रकल्पानं कोकणाचं काहीही भलं होणार नाही. शेतकरी, मच्छिमार देशोधडीला लागतील त्यामुळे हा प्रकल्पच रद्द करण्याची घोषणा करा अशी मागणीही प्रकल्पस्तांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना केली.

त्याचबरोबर काही जणांनी प्रकल्पाचं स्वागत केलं असलं तरी या समर्थकांना प्रकल्प विरोधकांनी घोषणाबाजी करून तीव्र विरोध केला. त्यामुळे सभेच्या ठिकाणी वारंवार तणावाचं वातावरण निर्माण होत होतं. त्याआधी विरोधकांची घोषणाबाजी, आमदार राजन साळवी आणि नारायण राणेंची बाचाबाची यामुळेही तणाव झाला होता. प्रकल्पग्रस्तांनी बाजू मांडल्यानंतर, मग हुसेन दलवाई, पतंगराव कदम, नारायण राणे आणि त्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचं मत मांडलं.

close