प्रकल्पग्रस्तांच्या राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

February 26, 2011 9:45 AM0 commentsViews: 2

26 फेब्रुवारी

मुख्यमंत्र्यांच्या जैतापूर दौर्‍यावर प्रकल्पग्रस्तांना बाजू मांडताना नारायण राणेंनी रोखल्यामुळे वातावरण काही काळ तंग झालं होतं. प्रकल्पग्रस्तांनी राणेंच्या दडपशाहीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विरोध कायम ठेवला. त्यामुळे नारायण राणे संतापले. म्हणून काही प्रकल्पग्रस्तांनी आपले भाषण मध्येच थांबवलं आणि राणेंच्या विरोधात घोषणाबाजी सुरु झाली. डॉ.मिलिंद देसाई बोलत असताना मध्येच थांबले त्यांना कारणही तसेच होतं राणेंनी त्यांना त्यांच्या स्टाईलमध्ये काही सांगितलं होतं.

close