राज ठाकरे यांच्या हस्ते ‘कुसुमांजली’ कार्यक्रमाचं उद्घाटन

February 26, 2011 11:08 AM0 commentsViews: 7

26 फेब्रुवारी

कुसुमाग्रजांच्या जन्मशताब्दी आणि मराठी भाषा दिनानिमित्त पुण्यात शनिवार आणि रविवारी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते 'कुसुमांजली ' या कार्यक्रमाचं उद्घाटन बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आलं. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी आपण मराठी भाषेसाठी आंदोलन करतो. त्याला कोणी आंदोलन म्हणतं तर कोणी राडा म्हणतं. माझ्यासाठी या आंदोलनाचा मिळणारा रिझल्ट महत्त्वाचा आहे. असं म्हणतं कुसुमाग्रजाच्या भाषेत राज ठाकरे यांनी 'पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा' असं आव्हान मराठी माणसांना केलं. यावेळी जेष्ठ चित्रकार रवी परांजपे, जेष्ठ साहित्यिक ज.मा. मिरासदार, अभिनेते रविंद्र मंकणी हे मान्यवर उपस्थित होते.

close