घरच्या मचाणावर बिबट्या होता 12 तास बसून !

February 26, 2011 11:55 AM0 commentsViews: 3

26 फेब्रुवारी

नागपूर जवळील वेळाहरी गावात एका घराच्या मचाणावर बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. सकाळी 9 च्या सुमारास आपल्या घरच्या मचाणावर काही सामान घ्यायला गेले असता तिथं बिबट्या असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर वनविभागाला पाचरण करण्यात आलं. अखेर वनविभागाचे कर्मचारी आणि पोलिसांनी मिळून बिबट्याला बेशुद्ध करून पकडलं . तब्बल 12 तास हा बिबट्या मचाणावर वास्तव्य करून होता.

close