राष्ट्रीय स्पर्धेचा शानदार समारोप

February 26, 2011 12:18 PM0 commentsViews: 2

26 फेब्रुवारी

झारखंडमधल्या रांची इथं सुरु असलेल्या 34व्या राष्ट्रीय स्पर्धेचा आज समारोप झाला. समारोप सोहळ्यात अनेक रंगारंग कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पण प्रमुख आकर्षण ठरलं ते पॅरा ग्लाईडिंगच्या चित्तथरारक कसरती. या समारोप सोहळ्याला झारखंडचे मुख्यमंत्री अर्जुन मुंडा, शिबू सोरेन असे अनेक नेते उपस्थित होते. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश कलामाडी यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. पण या कार्यक्रमाला केंद्रीय क्रीडामंत्री अजय माकन हे मात्र गैरहजर राहिले. सुरेश कलमाडी यांच्याबरोबरच्या भांडणामुळेच ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत असं बोललं जाते. राष्ट्रकुल संयोजन समितीच्या अध्यक्षपदावरुन कलमाडी यांची हकालपट्ट करण्याचा निर्णय माकन यांनी घेतल्यानंतर या दोघांमध्ये वाद निर्माण झाला आहे.

स्पर्धेचे शेवटचे दोन दिवस खासकरुन धूम होती ती सांघिक खेळांची आणि पंजाब तसेच हरियाणा टीम मेडल जिंकण्यात आघाडीवर होत्या. हॉकी स्पर्धेत पुरुषांमध्ये पंजाबची टीम तर महिलांमध्ये हरियाणाची टीम अव्वल ठरली. तर यजमान झारखंडच्या टीमला सिल्व्हर मेडलवर समाधान मानावं लागलं. फुटबॉलमध्ये मात्र गोल्ड जिंकलं ते पश्चिम बंगालच्या टीमने. पंजाबने सिल्व्हर जिंकलं. फायनल मेडल टॅलीमध्ये मात्र सेनादलाची टीम अव्वल ठरली. भारतीय टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणी वेळात वेळ काढून काही दिवसांपूर्वी स्पर्धेला हजेरी लावून गेला.

close