पुढील निवडणुका स्वबळावर !

February 26, 2011 2:19 PM0 commentsViews:

26 फेब्रुवारी

पुढील वर्षात होणार्‍या जिल्हापरिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसनं सुरु केलाचे सुतोवाच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. या निवडणुकांमध्ये दोन्ही काँग्रेसची आघाडी व्हावी असे जरी आपणाला वाटत असले तरी काँग्रेस पक्ष तडजोडीच्या भुमिकेत नाही अशा वेळी राष्ट्रवादीला स्वबळावर निवडणुका लढल्याशिवाय पर्याय राहात नाही असे स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. पुढील वर्षात होणार्‍या जिल्हापरिषद निवडणुकांसाठी राष्ट्रवादीने नवी मुंबईत पंचायत राज परिषद भरवली होती.

close