औरंगाबादमध्ये उघड्या इल्क्ट्रॉनिक डीपीमुळे नागरिकांना धोका

November 6, 2008 9:21 AM0 commentsViews: 11

6 नोव्हेंबर, औरंगाबादसंदीप कुलकर्णी औरंगाबाद शहरातल्या म्हाडा कॉलनी, विठ्ठलनगर आणि श्रीरामनगर भागात उघड्या इलेक्ट्रीक डीपी मुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आलं आहे. घराशेजारी, रस्त्यावर असलेल्या उघड्या डीपी बंद करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. पण, याकडे कुणीच लक्ष दिलं नाही. त्यामुळे या नागरिकांनी आयबीएन लोकमतकडे धाव घेतली. आमचे सिटीझन जर्नालिस्ट संदीप कुलकर्णी यांनी सजग नागरिकत्वाचे उदाहरण देत सादर केलेली हा स्पेशल रिपोर्ट.संदीप कुलकर्णी औरंगाबाद शहरातील म्हाडा कॉलनीत राहतात. या ठिकाणी याभागातल्या सर्वच इलेक्ट्रीक डिपी रस्त्यावर असल्यानं याचा त्रास होतोय. अनेकदा आंदोलनं केली पण याकडे लक्ष दिलं गेलं नाही. काही दिवसांपुर्वी या डिपीमुळे एका मुलीला शॉक बसला तरीही याकडं लक्ष दिलं गेलं नाही. सर्वच डिपी उघड्या आहेत. रस्त्याच्या कडेला आणि त्याही लहान मुलाला पोहचतील अशाच असल्यानं धोका निर्माण झाला आहे. याविषयी अनेक नागरिकांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.या भागातील नागरिक वेळेवर कराचा आणि बिलाचा भरणा करतात. पण, आपली कर्तव्ये जागरुकतेने पार पाडणार्‍या नागरिकांशी प्रशासनाला काहीच घेणं देणं नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

close