राष्ट्रवादी आ.वाघ यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे -मुंडे

February 26, 2011 2:34 PM0 commentsViews: 7

26 फेब्रुवारी

राष्ट्रवादीचे राज्यातले नेते बलात्काराच्या गुन्ह्यात अडकलेले आमदार दिलीप वाघ यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप भाजपचे लोकसभा उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी केला. चांदवडमध्ये आयोजित जाहीर सभेनंतर ते बोलत होते. कांद्याच्या भावांमधल्या चढउतारास केंद्र सरकार जबाबदार असल्याचं ते म्हणाले. मनसेबाबतच्या आपल्या वक्तव्यावर आपण ठाम असून समविचारी पक्षानं सोबत येणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रवादीच्या आमदारांचे कृत्य लाजीरवाणं असून त्यांना सरकार पाठीशी घातल असल्याचा आरोपही त्यांनी केला.

close