आ.वाघ यांना पोलिसांना शरण जाण्यास पवारांचा आदेश

February 26, 2011 2:40 PM0 commentsViews: 3

26 फेब्रुवारी

राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित केल्यानंतर आता दिलीप वाघ यांनी पोलिसांना शरण जावं असा आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहे. पाचोर्‍याचे आमदार असलेल्या दिलीप वाघ यांच्या बलात्कारचा आरोप आहे. त्याबाबत पोलिसात तक्रारही दाखल आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबितही करण्यात आलंय. आता दिलीप वाघ यांनी पोलिसांना शरण गेले पाहिजे आणि पोलीस तपासाला सामोरं गेलं पाहिजे पोलीस कारवाई बरोबरच न्यायालयीन प्रक्रियेला सामोरं गेलं पाहिजे असं स्पष्ट मत व्यक्त केले आहे. या प्रकरणात विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे.

close