सहा वर्षाचा मुलगा 17 फुट खोल खड्‌ड्यात पडला

February 26, 2011 4:09 PM0 commentsViews: 2

26 फेब्रुवारी

अहमदनगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यातील घोडेगाव इथं एक सहा वर्षाचा मुलगा बोअरवेलच्या उघड्या खड्‌ड्यात पडला. ज्ञानेश्वर सोनवणे असं या सहा वर्षीय मुलाचं नाव आहे. ज्ञानेश्वर खड्‌ड्यात 17 फुट खाली अडकला आहे. तीन तासांपासून स्थानिक प्रशासन मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मुलाला वाचविण्यासाठी खड्‌ड्याच्या आजूबाजूने खड्डा खोदण्याचे कामही सुरू आहे.

close