मॅचसाठी पूर्णपणे सज्ज – धोणी

February 27, 2011 8:50 AM0 commentsViews: 3

27 फेब्रुवारी

वर्ल्ड कपमध्ये आजचा दिवस ऍक्शन सनडे असणार आहे. कारण ग्रुप बीच्या दोन बलाढ्य टीम आमने सामने येत आहेत. भारताचा मुकाबला आहे तो इंग्लंडशी. या मॅचचं महत्त्व दोन्ही टीमना माहिती आहे. त्यामुळेच कदाचित इंग्लंडचा कॅप्टन अँड्र्यू स्ट्राऊस भारताबरोबर माईंडगेम खेळतोय. या मॅचसाठी इंग्लंडपेक्षा भारतावरच दडपण जास्त असेल असं त्याने म्हटलं आहे. पण भारताचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणी मात्र टीम या मॅचसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचं म्हटलं आहे. तसेच भारताचा फास्ट बॉलर आशिष नेहरा पूर्णपणे फिट नाही. त्यामुळे या मॅचमध्ये तो खेळणार की नाही याचा निर्णय मॅचआधी घेण्यात येईल असंही धोणीनं स्पष्ट केलं आहे.

close