लिबियात अडकलेल्या 700 भारतीयांची सुटका

February 26, 2011 3:36 PM0 commentsViews: 2

26 फेब्रुवारी

लिबियामधली परिस्थिती अजूनही चिघळलेलीच आहे. लिबियात अडकलेल्या 18 हजार भारतीयांपैकी 700 भारतीयांना घेऊन एअर इंडियाची दोन विमान निघाली आहेत. दिल्लीहून ही दोन्ही विमानं तिथं अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी गेली आहेत. त्यातलं पहिलं विमान आज रात्री साडेअकरा वाजेपर्यंत दिल्लीला पोहचेल तर दुसरे विमान मध्यरात्री भारतात पोहचेल. शिवाय तीन जहाजही लिबियाकडे रवाना झालेली आहेत.

close