राहुलचा मृत्यू जवळून गोळी लागल्यानं- पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट

November 6, 2008 9:43 AM0 commentsViews: 87

6 नोव्हेंबर, मुंबई मुंबईच्या बेस्ट बसमध्ये बिहारमधील राहुल राजचा मृत्यू जवळून गोळी लागल्यानं झाल्याचं पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये उघड झालं आहे. हा रिपोर्ट अद्याप मुंबई पोलिसांनी राज्य सरकारला सादर केलेला नाही. राहुल राज प्रकरण अजुनही देशभरात गाजतंय. दिल्लीपर्यंत हे प्रकरण गेलं आहे. याप्रकरणी राज्य सरकारनं एक समिती स्थापन केली आहे. 27 ऑक्टोबरला कुर्ल्यामध्ये बेस्ट बस एन्कॉऊन्टरमध्ये ठार झालेल्या राहुल राजचा मृत्यू जवळून गोळी लागल्यानं झाला आहे, अशी माहिती पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये देण्यात आली. जे. जे. रुग्णालयानं हा रिपोर्ट दिला आहे.या घटनेचा क्राईम ब्रँच तपास करत आहे. राहुलचा पोस्टमार्टम रिपोर्ट तपास अधिकार्‍यांना सादर करण्यात आला. पोलीस कारवाईत राहुलवर पाच गोळ्या झाडल्या गेल्या आहेत. राज्य सरकारनं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीनं अद्याप अहवाल सादर केलेला नाही.

close