राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आज झाडाझडती ?

February 27, 2011 9:25 AM0 commentsViews: 6

27 फेब्रुवारी

राज्य मंत्रिमंडळातल्या उपमुख्यमंत्र्यांसह राष्ट्रवादीच्या 20 मंत्र्यांची बैठक पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी बोलावली आहे. सकाळी 11 वाजता मुंबईतल्या नेहरू सेंटर इथं मंत्र्यांची कार्यशाळा सुरु झाली. गेल्या सरकारच्या तुलनेत यावेळच्या सरकारमधील राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही अशी कुजबूज पक्षात सुरू आहे. काही मंत्र्यांच्या कार्यपद्धतीबद्दल तक्रारी आहेत. काही मंत्र्यांमधील वादाचा फटका पक्षाला बसतो आहे. गटा-तटाच्या राजकारणाने पक्षात डोकं वर काढलं आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार राष्ट्रवादीच्या 20 ही मंत्र्यांची झाडाझडती घेणार असल्याचं बोललं जातं आहे.

close