जब्बार पटेल व्ही. शांताराम पुरस्कार ; राज्य सरकारचे सांस्कृतिक पुरस्कार जाहीर

February 27, 2011 10:13 AM0 commentsViews: 30

27 फेब्रुवारी

गेल्या 5 वर्षांपासून बंद असलेले सांस्कृतिक क्षेत्रातले राज्य सरकारचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढाकार घेवून या पुरस्कारांची घोषणा केली आहे. यावर्षीचा व्ही शांताराम पुरस्कार दिग्दर्शक जब्बार पटेल यांना घोषीत करण्यात आला आहे. संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार गायिका फैयाज यांना मिळाला. रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांना देण्यात देण्यात येणार आहेत. तर 2010 च्या विशेष गौरव पुरस्कारानं स्मिता तळवलकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे राज कपूर विशेष योगदान पुरस्कार शबाना आझमी यांना घोषीत करण्यात आला तर 2010 चाराज कपूर जीवन गौरव पुरस्कार हा गोविंद निहलानी यांना मिळाला आहेत.

close