मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मराठी उद्योजकांचा पुरस्कार प्रदान

February 27, 2011 10:34 AM0 commentsViews: 7

27 फेब्रुवारी

मराठी जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीजच्या वतीने मराठी उद्योजकांना दरवर्षी उद्योगरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं. या वर्षी चार उद्योगपतींना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्योगरत्न पुरस्कार देण्यात आले. बाबा कल्याणी, संजय काकडे, अशोक खाडे आणि अचलाताई जोशी यांचा गौरव करण्यात आला. पूर्वी मराठी माणूस उद्योगात पडला असं म्हटलं जायचं पण आता मराठी माणूस उद्योगात उभा राहिलाय असं मत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केलं.

close