शिवसेना मराठी भाषा भवन उभारणार !

February 27, 2011 10:51 AM0 commentsViews: 4

27 फेब्रुवारी

मराठीला जागतिक अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी शिवसेना पूर्ण प्रयत्न करेल असं शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मराठी दिनानिमित्त शिवसेनेनं दादरच्या रवींद्र नाट्य मंदिरात एका कार्यक्रम आयोजन केलं होतं त्यात ते बोलत होते. मुंबईमध्ये शिवसेना मराठी भाषा भवन उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. मुंबईच्या महापौर श्रद्धा जाधव, शिवसेनेचे खासदार मनोहर जोशी हेही यावेळेस उपस्थित होते.

close