दुर्मिळ मराठी पुस्तकांचा संग्रह "बुकशॉपी" मध्ये !

February 27, 2011 11:26 AM0 commentsViews: 14

सागर मालाडकर, मुंबई

27 फेब्रुवारी

मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी 1960 मध्ये यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ स्थापन करण्यात आलं. आणि या 50 वर्षात साहित्य मंडळानं आधुनिक काळासोबत, मराठी भाषा प्रवाही राहावी आणि टिकून राहावी यासाठी असंख्य उपक्रम राबवले.

"मराठी भाषा ही राजभाषेचा साज घेऊन मंत्रालयाच्या दारात लक्तरं पांधरन उभी आहे…" कुसुमाग्रजांनी 1988 साली केलेल्या याच विधानानंतर मराठी भाषा संवर्धनाच्या कामाने जोर धरला. आणि महाराष्ट्र राज्य साहित्य, संस्कृती मंडळाने वैचारिक पुस्तकांच्या छपाईसोबतच, शब्दकोष तयार करणे, राज्याच्या सांस्कृतिक धोरणाला आकार देणे, मराठी साहित्य सूची अद्ययावत करणं अशी अनेक महत्वाची कामं हाती घेतली.

बदलत्या टेक्नॉलॉजीचं प्रतिबिंब मराठी भाषेत उमटावं यासाठीही मंडळ प्रयत्नशील आहे. राज्याच्या राजधानीत मराठी भाषेला वाहिलेलं एक मराठी भाषा भवन लवकरच उभं राहणार आहे. सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे आणि मंडळातर्फे हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मंडळाचा नवा उपक्रम आहे तो "बुकशॉपी"चा. मंडळाच्या प्रकाशनासोबतच दुर्मिळ पुस्तकांचा खजिना इथं मराठी प्रेमींसाठी सदैव खुला असतो.

close