मराठीच्या मुद्यावर मुख्यमंत्र्याच्या मदतीला विरोधक

November 6, 2008 9:53 AM0 commentsViews: 3

6 नोव्हेंबर, मुंबई मराठीच्या मुद्यावर सगळ्यांनी एकत्र येण्याचं आवाहन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला विरोधी पक्षांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्रातील परप्रांतीयांवरील वाढते हल्ले आणि राहुल राज प्रकरणी बिहारमधील नेते एकत्र आले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मराठी अमराठी वादासंदर्भात राज्यसरकारची विरोधकांशी चर्चा सुरू असून शिष्टमंडळासह ते पंतप्रधानांची भेट घेणार आहेत.'विरोधी पक्षांशी यासंदर्भांत संपर्कात आहोत. लवकरच पंतप्रधानांची भेट घेणार आहोत ', असं मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचे पंतप्रधानांनी स्वागत केलं आहे. ' बिहारच्या जनतेसाठी तिथले नेते एकत्र आले आहेत. महाराष्ट्रातही तशा हालचाली सुरू आहे, ही चांगली गोष्ट आहे ', असं खासदार संजय राऊत म्हणाले तर भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे म्हणाले, मुख्यमंत्र्यांची भूमिका समजावून घेवू. पण त्याआधी रेल्वेच्या परीक्षा महाराष्ट्राबाहेर होता कामा नये '. एकंदर विरोधकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

close