आ.वाघ यांच्यासह पीएला 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

February 27, 2011 3:57 PM0 commentsViews: 1

27 फेब्रुवारी

जळगाव जिल्ह्यातील पाचोर्‍याचे आमदार दिलीप वाघ आणि त्यांचे पीए महेश माळी यांना न्यायालयाने 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नोकरीचं आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार त्यांच्या विरोधात नाशिकमध्ये दाखल करण्यात आली. आचारसंहिता सुरू असताना त्यांनी यासाठी शासकीय विश्रामगृहाचा गैरवापर केल्याचाही ठपका आहे. शनिवारी संध्याकाळी आमदार वाघ यांना पोलिसांनी अटक केली तर आज सकाळी त्यांचा पीए महेश माळी याला ताब्यात घेतलं. दोघांनाही आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं.

close