आम्ही अजून युतीमध्ये गेलेलो नाही – आठवले

February 27, 2011 6:15 PM0 commentsViews: 8

27 फेब्रुवारी

पुण्यात रिपब्लिकन पक्षाचा निर्धार मेळावा भरवण्यात आला होता. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येण्याबद्दल या मेळाव्यात रामदास आठवले काही घोषणा करतील असं वाटलं होतं. पण आम्ही अजून शिवसेना- भाजपमध्ये गेलेलो नाही असं विधान आठवलेंनी केलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. पण याबाबत आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही असं आठवले यांनी सांगितले. त्याचबरोबर राष्ट्रवादी आणि काँग्रेसला धक्का देण्याचा निर्धार आम्ही केला आहे असंही ते म्हणाले. या मेळाव्यामध्ये दलित पँथरचे नेते नामदेव ढसाळ हेही उपस्थित होते. त्यांनी उद्धव ठाकरेंची प्रशंसा केली.

close