नाट्यमहोत्सवच मराठी नाटकाचे तारणहार -प्रभाकर पणशीकर

November 6, 2008 9:58 AM0 commentsViews: 24

6 नोव्हेंबर, पुणे सागर शिंदे ''मराठी नाट्यव्यवसाय आता विझलेल्या अवस्थेत आहे. नाटकं फारशी होत नाहीत. जी होतात त्यांना चांगलं उत्पन्न मिळत नाही आणि चांगली नाटकं येत नाहीत. अशा विचित्र अवस्थेत सापडलेल्या नाट्यव्यवसायाला बाहेर काढण्यासाठी नाट्यमहोत्सव वेगवेगळ्या ठिकाणी जर आयोजीत केले गेले तर मराठी नाट्यसृष्टीला उभारी मिळेल,' अशी खंत ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांनी व्यक्त केली. मराठी रंगभूमी दिना निमित्ताने पिंपरी- चिंचवड इथे 'पिंपरी-चिंचवड नाट्यमहोत्सवा'चं आयोजन केलं होतं. त्या नाट्यमहोत्सवाचं उद्घाटन प्रभाकर पणशीकर यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. त्यावेळी नाट्यव्यवसायाला आलेले वाईट दिवस आणि तोडफोडीचं राजकारण यावर बोलताना त्यांनी आपल्या मनातली खंत व्यक्त केली. 'नाटकाबरोबरच आजचं सत्तेसाठी चाललेलं राजकारण बदलणं आवश्यक असल्याचं'ही मत प्रभाकर पणशीकर यांनी व्यत केलं आहे. ''आता सर्वत्र अगदी तोडफोड चालू आहे. आपण एकमेकांपासून तुटत चाललो आहोत. अशावेळी माणसाला जोडणारा कार्यक्रम आणि कार्यकर्ता निर्माण होणं गरजेचं आहे आणि त्याच्यामागे सर्व समाज गोळा होणं ही काळाची गरज आहे,'' असंही प्रभाकर पणशीकर म्हणाले. पिंपरी-चिंचवड शहरात भरवण्यात आलेला या नाट्यमहोत्सवामध्ये सलग तीन दिवस वेगवेगळी नाटकं पाहण्याचा आनंद नाट्यरसिकांना घेण्यात येणार आहे.

close